। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलजवळील गव्हाण फाटा उलवे ते जासई जाणार्या ब्रीजवर एका दुचाकीला मागून येणार्या कारने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार खाली पडून जखमी झाला आहे.
सुंदर मोकल (33) हा त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन कंपनीच्या कामानिमित्त उलवेवरुन जासई येथे जात होता. दरम्यान, गव्हाण फाट्याजवळ उलवे ते जासई जाणार्या ब्रीजवर आला असताना मागून येणार्या कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तो खाली पडून जखमी झाला आहे. या घटनेनंतर वाहनचालक न थांबता घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत उलवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.