ऑडीत सापडली बॉडी

पनवेल | वार्ताहर |

पनवेल-पेण रोडवरील तारा गावच्या हद्दीत एका लाल रंगाच्या ऑडी गाडीमध्ये मृतदेह असल्याचे दिसून आल्याने खळबळ माजली आहे. गाडी क्रमांक एमएच 14 जीए 9585 ही गाडी कागदोपत्री पुणे जिल्ह्यातील तेजस प्रकाश साळवे यांच्या मालकीची दिसत आहे. ही गाडी तारा गावच्या हद्दीत एका फार्म हाऊससमोर गेल्या दोन दिवसांपासून उभी आहे. या गाडीत एका पुरुषाचा मृतदेह आहे. त्याने अंगावर टीशर्ट, जीन्स पॅन्ट घातलेली असून, पायात स्पोर्ट्स शूज आहेत. सापडलेला मृतदेह नक्की कोणाचा आहे, याबाबत पोलिसांकडून तपास केला जातोय. मात्र, ऑडीसारख्या लक्झरी कारमध्ये मृतदेह सापडल्याने ही हाय प्रोफाइल केस असल्याचे नागरिकांकडून बोललं जातंय.

Exit mobile version