| माथेरान | वार्ताहर |
माथेरानच्या खोलदरीत कुजलेल्या अवस्थेत मानवी मृतदेह सापडून आला. येथील स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने माथेरान पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेत पाहणी केली, असता कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. सहा ते सात दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय यावेळी पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, हा मृतदेह पदु चांगो उघडा यांचा असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
उंच भागावरून पडून पदू उघडा यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात सांगण्यात आले असून, मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी तूंगेकर यांच्या शववाहिनीतून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता. याप्रकरणी माथेरान पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास माथेरान पोलीस करीत आहेत.