| तळा | वार्ताहर |
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालविकास आणि प्राथमिक विभागाच्या विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्राथमिक विभागाचे चेअरमन किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा स्नेहल तळकर, सदस्य स्नेहल शिंदे, नूतन लोखंडे, शारदा केतकर, किरण सातांबेकर, विनायक महाडकर, युगंधर साबळे, विट्ठल सुतार, व संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांच्यासह मुख्याध्यापक श्री. भाटे, शिक्षक साबळे, सौ. बांगर, सौ. महाडकर, सौ. पाटील, सौ. पातेरे, सौ. वारगुडे, श्रीम. काप, सौ. पवार, चिले, फोंडळ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण देशमुख आपल्या उद्घाटनपर भाषणात लहान मुलांना अतिशय सुंदर प्रतिकृति बनविलेल्या आहेत. क्षेत्र कोणतेही असो, कला कोणतीही असो जीवनामध्ये या प्रत्येक गोष्टीचा उपयोग होत असतो. त्यामुळे आपले जीवन निरामय, निरागस होण्यासाठी मदत होत असते. यासाठी पालकवर्गाने लक्ष दिले पाहिजे. शाळेत आम्ही या सर्व कलांना प्राधान्य देतो. जेणे करून शिक्षण बरोबरच भौतिक ज्ञान आत्मसात करता येते, असे बहुमोल विचार व्यक्त केले.
विज्ञान प्रदर्शनात बालविकास विभाग प्रथम क्रमांक स्वरूप साबळे, द्वितीय तन्वी प्रधान, तृतीय सुजल गायकवाड आणि तनवी मोरे, प्राथमिक विभाग इ. 1 ली ते इ. 2 री प्रथम आरुष महाडकर, द्वितीय श्रीनिती तळकर, तृतीय श्लोक सुतार, इ. 3 री ते इ. 4 थी प्रथम वेद महाडकर, द्वितीय लावण्या केतकर व प्रज्ञा महाजन आणि तृतीय योग पाटील असे नंबर प्राप्त केले आहेत.
चित्रकला प्रदर्शन छोटा गट प्रथम हसनेन रहाटविलकर, द्वितीय आरुष महाडकर, तृतीय वेद महाडकर, मोठा गट प्रथम श्लोक शिर्के, द्वितीय योग पाटील, तृतीय प्रज्ञा महाजन, रांगोळी प्रदर्शन छोटा गट प्रथम सई शिर्के, द्वितीय आरुष महाडकर, मोठा गट प्रथम मीनाक्षी खांडेकर, द्वितीय प्रज्ञा महाजन, तृतीय परि शिर्के याप्रमाणे विद्यार्थ्यांनी नंबर प्राप्त केले आहेत. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. संतोषसिंह जमादार व प्रा. बाबू शिंदेसर यांनी केले. शेवटी आभार नितेश साबळे यांनी मानले.