पनवेल परिसरात आढळला मृतदेह

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 35 ते 40 वर्षे, केस काळे वाढलेले, दाढी मिशी वाढलेली असून त्या इसमाच्या अंगात निळ्या पांढऱ्या रंगाचा बारीक चौकटीचा फुल शर्ट, डाव्या हातात काळ्या रंगाचा रब्बर बँड, व निळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. तसेच त्याच्या उजव्या पायात जुन्या जखमेमुळे सूज आलेली आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर – 022- 27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगले यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version