| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव गावाच्या हद्दीत दरीच्या बाजूला संरक्षक कठड्यालगत अंदाजे 50 ते 55 वर्षे वयाच्या एक अज्ञात पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार आत्महत्या की घातपाताचा, असा सवाल उपस्थित होत आहे.
याबाबत भोगाव पोलीस पाटील शुभांगी राकेश उतेकर यांनी या घटनेची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे व पोलीस हवालदार आर.के. सर्णेकर, संग्राम बामणे, तुषार सुतार, सौरव जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी सदर मृतदेह दोन ते तीन दिवस उन्हाने काळवंडला असून, परिसरात प्रचंड दूर्गंधी पसरली होती. पोलादपूर पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.