। मुंबई । प्रतिनिधी ।
महायुती सरकार येऊन चार महिने उलटले तरीही मुख्यमंत्र्यांचे जे सरकारी निवासस्थान आहे. त्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहायला गेले नव्हते. मात्र, यानंतर साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला आहे. याबाबत अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला. आपल्या लेकीच्या 10 वीच्या परीक्षेसाठी गेल्या 5 महिन्यांपासून मुख्यमंत्री हे जुन्याच घरी म्हणजे सागर बंगल्यावर राहत होते. मुलीची परीक्षा असल्या कारणाने मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो नाही. शिवाय तिथे थोडं डागडुचीचं कामही बाकी आहे. त्यामुळे, लेकीच्या परीक्षेनंतर मी वर्षा बंगल्यावर राहायला जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. अखेर अक्षय्या तृतीयेचा मुहूर्त साधत वर्षा बंगल्यावर प्रवेश केला.