| अलिबाग | वार्ताहर |
नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची सन-2025 ची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या गुरुवार, दि. 1 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. सेक्टर वन/एस, प्लॉट नं.136/बी, शबरी हॉटेल जवळ, नवीन पनवेल येथे ही सभा होणार आहे. या सभेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. ज्या सभासदांना (नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका क्षेत्र, रायगड जिल्हा येथील) मंडळाची कार्यक्रम पत्रिका मिळाली नसल्यास हेच निमंत्रण समजून सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे सचिव हेमकांत सोनार यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी अध्यक्ष प्रवीण भामरे 9223391919, सचिव हेमकांत सोनार 9511882557, कोषाध्यक्ष विजय भामरे 9821105896 यांच्याशी संपर्क साधवा.