। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहर परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहे. शहरातील प्लॉट नंबर 76, झुंजार सोसायटीच्या गेटच्या बाजूला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, त्याचे अंदाजे वय 55 ते 60वर्ष, रंग सावळा, उंची अंदाजे 5 फूट 5 इंच, चेहरा उभट, अंगाने मजबूत, डाव्या हाताच्या कोपरा जवळ जुनाट जखमा असून, अंगात काळसर रंगाची फुल पॅन्ट व निळ्या रंगाचा हाफ बाह्याचा टीशर्ट, पायात निळ्या रंगाचे शूज आहेत. या अनोळखी व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.






