बेपत्ता मोहन म्हात्रेंचा खाडीत मृतदेह

। नागोठणे । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील पालखार येथील रहिवासी मोहन म्हात्रे हे दि. 18 नोव्हेंबर पासून पेण येथून बेपत्ता होते. मोहन म्हात्रे यांचा सर्वत्र शोध सुरु असतानाच त्यांचा मृतदेह दि.22 नोव्हेंबर रोजी नागोठणे जवळील निडी गावच्या हद्दीत खाडीमध्ये आढळून आला. या संदर्भात माहिती मिळताच नागोठणे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

यानंतर मोहन म्हात्रे यांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढून नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच गांभीर्य लक्षात घेऊन रोहा पोलीस उपअधीक्षक किरण सुर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.दरम्यान मोहन म्हात्रे यांचा मुलगा अक्षय म्हात्रे याने दिलेल्या फिर्यादीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version