बेपत्ता युनियन बँकेचा शिपायाचा पालव स्मशानभूमी येथे मृतदेह सापडला; धारदार हत्याराने केली हत्या

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
बेपत्ता असलेल्या अलिबाग येथील युनियन बँकेतील शिपाई नथुराम रुपसिंग पवार याचा मृतदेह पालव येथिल स्मशानभुमी येथे सापडल्याने खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीची धारदार हत्याराने केली हत्या.
युनियन बँक अलिबाग येथे शिपाई म्हणून असलेले नथुराम पवार हे दिनांक 13 मार्च 2023 पासून अलिबाग येथून बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध नातेवाईक सर्वत्र घेत होते. आज दिनांक 14 मार्च 2023 रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील पालव परिसरात नथुराम पवार यांचा मृतदेह सापडला असल्याची चर्चा अलिबाग येथे झाली असता त्याची सत्यता पडताळणीसाठी अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सदर घटनेला दुजोरा दिला आहे.

Exit mobile version