। पुणे । वृत्तसंस्था ।
पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
फुरसुंगी पॉवर हाउसशेजारील कामठे वस्तीत हि घटना घडली आहे. टँकरचालक पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे हे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे टँकर घेऊन ते फुरसुंगीतील सचिन कामटे यांच्या घरी पाणी पोहोचविण्यासाठी गेले. मात्र, टँकरच्या वॉलमधून पाणी येणे बंद झाले. म्हणून त्यांनी वॉल आणि पाइप काढून पाहिले असता, साडीचा पदर नजरेस पडला. नक्की काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी वर चढले. टँकरचे झाकण उघडले असता आत एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली.
हडपसर पोलिसांनी घटनास्थळी हजर होऊन टँकरमधील पाणी काढून मृतदेह खाली उतरवला. तसेच, शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला.
पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
