नरिमन पॉईंट येथील समुद्रात सापडला तरूणीचा मृतदेह

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातील नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरूणीचा मृतदेह सापडला. तरूणीच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या. तरूणीचा मृतदेह समुद्रात सापडल्यानंतर कफ परेड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तसेच मृतदेह ताब्यात घेत तपासाला सुरूवात केली. तरूणीची हत्या झाली की आत्महत्या? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनिता गुप्ता (24) असे तरुणीचे नाव आहे. ही तरूणी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तरूणी बेपत्ता झाल्यानंतर कफ परेड पोलिसांना कळवण्यात आले. तरूणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या मिसिंगची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तरुणीचा मृतदेह नरिमन पॉईंट येथील समुद्रात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, तरूणीचा समुद्रात मृतदेह आढळल्यानंतर या घटनेमागील गुढ अधिक वाढले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version