बोकडविरा ग्राम सुधारणा मंडळाची कार्यकारणी जाहीर

| उरण | वार्ताहर |

गुढीपाडव्याच्या शुभ दिनी परंपरेनुसार बोकडवीरा गावातील गणेश मंदिर येथे पंचांग वचन व ग्राम सुधारणा मंडळाची नवीन कार्यकारणी निवड संदर्भात ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील वर्षाचा पंचांग वाचन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या सूचनेनुसार व मागणीनुसार उरण पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी यांच्या समक्ष नवीन बोकडविरा ग्राम सुधारणा मंडळाची कार्यकारणी निवड करण्यात आली. सदर कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत लहू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सेक्रेटरी पदी श्रीकांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर कार्यकरणीची निवड बिनविरोध करण्यात आली. सर्व ग्रामस्थांनी नवीन कमिटीचे अभिनंदन केले व पोलीस प्रशासनाचे आभार मानून सभा संपन्न झाली.

Exit mobile version