बोकडवीरा ते शेवा उड्डाणपूल अंधारात

सिडकोच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष

| उरण | वार्ताहर |
द्रोणागिरी नोड व उरण शहराला जोडणार्‍या बोकडविरा ते नवीन शेवा उड्डाणपुलावरील पथदिवे बंद असल्याने पुलावर अंधार पसरला आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिडकोने उभारलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी सिडकोची आहे. मागील अनेक दिवसांपासून या उड्डाणपूलावर खड्डे पडले आहेत. त्यातच आता या पुलावरील पथदिवेही बंद पडल्याने पुलावर अंधार पसरला आहे.

या अंधारामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही समस्यांकडे सिडकोच्या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांना ही याचा त्रास सहन करावा लागत आहे. या उड्डाणपुलावरील पथदिवे सुरू करून खड्डेही भरावेत, अशी मागणी केली जात आहे

Exit mobile version