वाशीच्या ईनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबईमधील वाशी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या ईनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मेलमुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून मॉलमधील सर्व लोकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. सध्या बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वॉडकडून मॉलमध्ये तपासणी सुरू आहे. सुरक्षा कारणास्तव मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या मॉलच्या परिसरात नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सायबर सेलच्या मदतीने मेल पाठविणाऱ्याच शोध घेतला जात असून मेलद्वारे मिळालेल्या धमकीच्या सत्यतेची पडताळणी करण्यात येत आहे.

Exit mobile version