। उरण । प्रतिनिधी ।
मरी क्रिकेट क्लब खोपटे बांधपाडाच्या माध्यमातून नाना-नानी पार्क येथे अस्थिविसर्जन घाटाच्या रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक लोखंडी पाईप लावण्यात आले. यावर्षी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यातून मिळालेल्या आर्थिक नफ्यातून करण्यात हे काम करण्यात आले. यावेळी बी.एन.डाकी, विश्वनाथ पाटील, सुजित म्हात्रे, कैलास म्हात्रे, भावना म्हात्रे, योगेश पाटील, परेश ठाकूर, नरेंद्र पाटील, प्रकाश ठाकर, बबन ठाकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.