पालिका कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान जाहीर

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कायमस्वरुपी कर्मचार्‍यांना 33 हजार रुपये तर करार कर्मचार्‍यांना 27 हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदरच कर्मचारी, अधिकारी यांच्या सानु्ग्रह अनुदान जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी युनियनच्यावतीने महापालिका आयुक्त कैलाश शिंदे आणि परिवहन व्यवस्थापकांकडे लेखी निवेदनातून पाठपुरावाही केला होता. या निवेदनाची दखल घेत महापालिका आयुक्तांनी दसर्‍यापूर्वीच कर्मचार्‍यांसाठी सानुग्रह अनुदानाची घोषणा केल्यामुळे महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते रवींद्र सावंत यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका मुख्यालयात जाऊन महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांचे आभार मानले आहेत.

महापालिकेतील ठोक मानधनावरील कर्मचारी व कायम आस्थापनेतील अधिकारी-कर्मचारी, महापालिका परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावरील वाहक-चालक तसेच रोजंदारीवरील कर्मचारी व कायम कर्मचारी, महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षक व ठोक मानधनावरील शिक्षकांना तसेच तासिका शिक्षकांना सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्याची लेखी मागणी रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांकडे केली होती. या मागणीची दखल घेत दसर्‍यापूर्वीच सानुग्रह अनुदान जाहीर केल्याने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन रवींद्र सावंत यांनी आभार मानले. यावेळी शिष्टमंडळात राजेंद्र सुतार, मिलिंद आंबेकर, विजय नाईक, राजेंद्र इंगळे, कृष्णा घनवट, शिशिकांत ठाकरे, विजय राठोड, अमोल मेच्यकर, महापालिकेच्या सर्व आस्थापनेतील कर्मचारी प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Exit mobile version