साने गुरुजी बालभवन वाचनालयला पुस्तक भेट

म्हसळा | वार्ताहर |
साने गुरुजी बालभवन वाचनालय भापट या वाचनालयाला समाजसेवक प्रदीप सुधाकर मोहिते यांच्यातर्फे 15 पुस्तके ऐतिहासिक, महापुरुषांचे चरित्र, कांदबरी, कविता संग्रह,वाड्मय, भगवतगीता आदी पुस्तके भेट दिली.
प्रदीप मोहिते यांनी म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भागात भापट या गावी वाचनालय ला भेट दिली. यावेळी लक्ष्मण मोहिते, रविंद्र कुवारे, जयसिंग बेटकर, देवडे सर, गौरव मोहिते, रूतिका बेटकर, स्वप्नाली मोहिते, निकिता जोशी आदी उपस्थित होते.

Exit mobile version