। मुरूड जंजिरा । प्रतिनिधी ।
सर .एस .ए .हायस्कूल मुरुड जंजिरा सुर्वणमहोतसवाचे औचित्य साधून एस.एस.सी बँच 1972 आणि कोकण मराठी साहित्य परिषद मुरुडतर्फे मुरूड जंजिरा ‘आठवणीतील शाळा’ पुस्तक प्रकाशन सोहळा बांबू हाऊस मुरुड सागरकिनारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी संजय गुंजाळ, कोमसाप मुरुड शाखा अध्यक्ष पुस्तक विमोचक सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास दुसार, पुस्तकाचे लेखक सुबोध साने, नगरपरिषद शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर, दिपाली जोशी, उदय गद्रे, रायगड जिल्हा ग्रंथालय कार्यवाह संजय भायदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता पेंडसे यांनी केले.
पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात
