आरसीएफ विद्यालयात पुस्तकांची गुढी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

आर.सी.एफ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अलिबाग येथे गुढी पाडव्याच्या निमित्ताने पुस्तकाची गुढी उभारून नव्या कल्पनाची नवीन वर्षाची सुरवात केली.


आर.सी.एफ विद्यालयात वेगवेगळे सण समारंभ उत्साहाने साजरे होतातच पण या वर्षी गुढी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने उभारली. मुख्याध्यापिका सौ. जाधव यांनी त्याला मूर्त रूप दिले. सहायक शिक्षिका प्राची बि. देवळे व ग्रंथालय सहायिका सौ. ठाकरे, सहायक शिक्षिका गोखले यांना आज मुलांना वेगळ्या प्रकारची गुढी अनुभवायला मिळाली. या कार्यक्रमात सर्वच शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा हातभार लागला. विद्यार्थ्यांना आर.सी.एफ शाळेच्या समृद्ध वाचन व सर्व यातील ग्रंथाचे दर्शन झाले. दिवसभर शाळेतील वातावरण अत्यंत आनंदी व उत्साही होते. तसेच पालक प्रतिनिधीनी या उपक्रमात भेट दिली.

Exit mobile version