बोरोसील लिमिटेड कंपनीचा महाड पुरग्रस्तांना मदतीचा हात

महाड | प्रतिनिधी |

सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती ओढवली त्या त्यावेळी पूरग्रस्त आणि आपदग्रस्तांसाठी सर्वोतोपरी मदतीचा हात देणाऱ्या मुंबईतील बोरोसील लिमिटेड या कंपनीने व खेरुका फॅमिलीच्या वतीने महाड पूरग्रस्तांसाठीही मदतीचा हात देण्यासाठी बोरो सिल लिमिटेड कंपनी च्या १२ जणांची टिम जीवनावश्यक वस्तु व इतर संसारोपयोगी वस्तुंच्या किट चे वाटप करण्यासाठी शुक्रवार दि ७ ऑगस्ट रोजी महाडमध्ये आली होती.

मुंबई गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावा मध्ये व केंबुर्ली मोहल्ल्या मध्ये पूरग्रस्त कुटुंबांना बोरोसील कंपनीच्या वतीने किटचे वाटप करण्यात आले यावेळी या टिमचे सोबत रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र सावंत हे ही उपस्थित होते. या नंतर या कंपनी च्या वतीने महाड शहर व तालुक्यातील पुरग्रस्तासाठी आणलेल्या जीवनावश्यक व इतर संसारोपयोगी किट महाड पोलादपूर माणगांवचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कडे वाटपासाठी सुपुर्द करण्यात आल्या. याप्रसंगी बोरोसील लिमिटेड कंपनी च्या एच आर हेड देशपांडेसर,दिव्या घाडीगांवकर, अभिषेक शेट्टे, प्रशांत , संगिता नेगी, प्रथमा बी., निर्मल डि., ओलीवीया, शार्दुल ए., अभिषेक शेट्टी, रविंद्र पवार, प्रशांत एम., सचिन पाटील, अजय फुटक, मयुर एम. आदी स्टाफ उपस्थित होते.

यापूर्वीही बोरोसिल लिमिटेड कंपनी च्या वतीने पुरग्रस्त सांगली कोल्हापूर उस्मानाबाद येथे अशाच पद्धतीने मदतीचे वाटप करण्यात आले होते. समाजा प्रती असणारी बांधिलकी जपण्याचे काम कंपनी अविरतपणे करत आहे असे यावेळी दिव्या घाडीगांवकर यांनी सांगितले. महाडकरांच्या वतीने आमदार भरतशेठ गोगावले यांनी बोरोसिल लिमिटेड कंपनी व खेरुका फॅमिलीचे आभार व्यक्त केले आहेत.

Exit mobile version