पनवेलच्या राष्ट्रीय बॉक्सर-योगिनी आणि मुधरा पाटील
| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमधील दोन मुलींनी 25 ते 31 जुलै दरम्यान हरियाणाच्या सोनीपत येथे आयोजित चौथ्या बीएफआय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. योगिनी पाटील 52 किलो वजन गटात खेळली आणि महाराष्ट्रासाठी रौप्यपदक जिंकले. तिने तिच्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीत मध्य प्रदेश, बंगाल आणि दिल्लीच्या बॉक्सर्सचा पराभव केला. अंतिम सामन्यात ती हरियाणाकडून हारली.
मधुरा पाटील 54 किलोमध्ये खेळली आणि क्वार्टर फायनलमध्ये हरियाणाकडून हारली. तिच्या प्राथमिक फेरीत तिने पहिल्या फेरीत ओडिशा बॉक्सरचा पराभव केला होता. दोन्ही बॉक्सर्स ‘खेलो इंडिया’ साठी पात्र झाल्या आहेत. त्या फेब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. दोन्ही मुलींना एमपीएसए बॉक्सिंग क्लबमध्ये अद्वैत शेंबवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी ऑलिम्पियन अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे यांचे विशेष प्रशिक्षण मिळत आहे.