बीपीसीएलमध्ये स्थानिकांना रोजगार व्हावा

रसायनी | वार्ताहर |
रसायनीमध्ये बीपीसीएलच्या माध्यमातून मोठा नवा प्रकल्प येत असून या प्रकल्पामध्ये सर्वप्रथम प्रकल्पग्रस्त भुमीपूत्रांना तसेच परिसरातील गावांमधील तरुण तरुणींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरुपी नोकरीमध्ये 80 टक्के जागा या मिळाल्याच पाहिजेत अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी यांनी केली आह.
वाढत्या बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रकल्पामध्ये उपलब्ध होणार्‍या व्यवसायात प्राधान्याने स्थानिकांना संधी द्यावी , प्रकल्पामधील अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार त्या त्या शैक्षणिक विभागातील तरुण तरुणींना आपल्या मार्फत अ‍ॅप्रेन्टीस,ट्रेनी,आयटीआय पध्दतीने प्रशिक्षण देऊन प्रकल्पात सामावून घ्यावे,कोणत्याही प्रकारची भरतीची जाहिरात स्थानिक वृत्तपत्रा मधून प्रसिध्द करावी . तरी आपल्या उद्योगामध्ये 80 टक्के स्थानिक नोकरीत नसल्याचे भविष्यात आढळल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्याविरोधात स्थानिक लोकांच्या न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दीपक कांबळी यांनी बीपीसीएल व्यवस्थापनाला दिला .

Exit mobile version