ब्राह्मण सभेचा वर्धापनदिन उत्साहात

| पनवेल | वार्ताहर |

ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेचा 17वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहामधे हा कार्यक्रम संपन्न झाला. दीपप्रज्वलन व गणेशवंदना नृत्याने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी सभासद व त्यांच्या पाल्यानी रेखाटलेली चित्रे व हस्तकला आदी विविध कलाकृतीचे प्रदर्शन मांडण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सभासदांच्या साहित्यकृतींचा समावेश असलेल्या मंत्रपुष्प या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.


यावेळी पुरुष आणि महिलांनी सादर केलेल्या दोन एकांकिका हे कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. निलिमा देशपांडे लिखित व वैशाली केतकर दिग्दर्शित ममैत्रीचा झिम्माफ ही एकांकिका महिलांनी सादर केली. पुरुषांनी विजय मोंडकर लिखित व दिलिप रामबक्ष दिग्दर्शित गुण्यागोविंदाने ही एकांकिका सादर केली. प्रकाशयोजना मिलिन्द मोघे यांची होती व सर्वेश गोखले यांनी ध्वनिसंयोजन केले. गजानन पाटील व मयुरेश साठे यांनी संगीतसाथ केली. मिलिन्द गांगल, मानसी जोशी यानी व्यवस्थापन केले. पल्लवी देशपांडे व शीतल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विजय मनोहर यांनी आभारप्रदर्शन केले. डॉ. शिल्पा वैशंपायन यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. संस्थेच्या पदाधिकारी व सभासदानी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Exit mobile version