| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
अधिक श्रावणानिमित्त श्रीवर्धन येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरांत श्री लक्ष्मीनारायण देवस्थान न्यास व ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने विष्णु यागाचे आयोजन करण्यात आले होते. दापोली येथील श्री मुकुंदकाका परांजपे गुरुजी व इतर यांचे पौरोहित्याखाली आणि श्रीवर्धन येथील पुरोहित मंडळाचे सर्व सदस्य यांचे सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत धार्मिक, पवित्र व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पहिल्या दिवशी पवमान आवर्तने व अभिषेक आणि दुसऱ्या दिवशी हवन, महायज्ञ व महाप्रसाद असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या यजमानपदासाठी श्रीवर्धन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री.प्रसाद पेंडसे सपत्नीक बसले होते.