वीटभट्टी व्यावसायिक, आंबा बागायतदारांचे नुकसान
| खांब | वार्ताहर |
अवकाळी पावसाने सर्वच क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वीटभट्टी व आंबा बागायतदारांना अवकाळीचा मोठा फटका सहन करावा लागला आहे.
मागील आठवड्यात सलग तीन दिवस रात्री-अपरात्री या पावसाने हजेरी लावून सार्यांचीच तारांबळ उडवून दिली. याचा फटका उन्हाळी हंगामात भातशेती पिकविणार्या शेतकरीवर्गाला बसला असल्याने त्यांच्या चेहर्यावरही नाराजी दिसून येत आहे. तर, वीटभट्टी मालक व आंबा बागायतदारांनाही याचा मोठा फटका बसला असल्याचे पाहावयास मिळत आहे. आंबे पिकण्याच्या हंगामात व कच्च्या वीट तयार होऊन भट्टीत भाजण्याच्या वेळेलाच अवकाळी पावसाने मुहूर्त साधल्याने आंबा बागायतदार व वीटभट्टी व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला असल्याने भविष्यातील रोजीरोटीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार व वीटभट्टी मालकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.