एचआयव्ही बाधितांचा वधूवर परिचय मेळावा

| वावोशी | वार्ताहर |

खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या ए.आर.टी. केंद्रांतर्गत एच आय व्ही बाधित लोकांसाठी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण 20 जोडप्यांना एकमेकांचा परिचय करून देण्यात आला.

या मेळाव्याचे उद्घाटन रिलायन्सचे साईट प्रेसिडेंट आशु गर्ग यांनी केले. या कार्यक्रमाला ए.आर.टी.चे नोडल अधिकारी डॉ. आदित्य पालीवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. पर्णा बारडोलीया उपस्थित होते. यावेळी डॉ. आदित्य पालीवाल, डॉ. पर्णा बारडोलीया, तारा इंगळे यांनी उपस्थितांना एच.आय.व्ही सहजीवनाबाबत समुपदेशन केले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समुपदेशक तारा इंगळे, डेटा मॅनेजर मनाली कवाडे, फार्मासिस्ट वैशाली पाटील, नर्स शेरली रेजी, अजित मानामी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विहान प्रतिनिधीदेखील हजर होते.

Exit mobile version