शांताराम यशवंत गव्हाणकर शाळेचा उज्ज्वल निकाल

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान मधील शांताराम यशवंत गव्हाणकर या शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून बोर्डाची परीक्षा देणारे या शाळेचे सगळेच विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले आहेत. माथेरान मधील शांताराम यशवंत गव्हाणकर या शाळेचे एकूण 34 विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देण्यासाठी बसले होते .ते सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले असून या शाळेचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. यामुळे येथील सर्व विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार असे समजल्यावर विद्यार्थी आणि पालकवर्ग निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. या निकालाची प्रत माथेरान व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चौधरी यांच्यामार्फत सर्व मुलांना किंवा त्यांच्या पालकांना मोफत देण्यात आली. शांताराम यशवंत गव्हाणकर या शाळेतून 34 विद्यार्थ्यामध्ये प्रथम क्रमांक प्राची शैलेश बापर्डेकर 82.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक अनामिका नागेश कदम 82.40 टक्के, आणि तृतीय क्रमांक समीधा संदेश पाटील 79.60 टक्के गुण मिळवून प्राप्त केला आहे.
यावेळी शिक्षक दिलीप आहिरे, मुख्याध्यापक लक्ष्मण ढेबे, सचिन भोईर, अनिश पाटील, संतोष चाटसे, शिल्पा बहुरे, गव्हाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, रमेश ढोले, संघपाल वाठोरे, दिनेश बागवे, विदुला गोसावी यांसह पालक वर्ग उपस्थित होते.शाळेत जाऊन माजी नगरसेविका वासंती जांभळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Exit mobile version