चार लाखांचा ऐवज लंपास
| जळगाव | वृत्तसंस्था |
बहिणीकडे जेवणासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉक तोडून 1 लाख 60 हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 14 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना बळीराम पेठेतील एजीएम प्लाझामध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या गुन्हाचा छडा लावण्याचे आव्हान पोलीस दलापुढे आहे.
दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास त्यांचा भाऊ अबुबकार खान हा घरी आला असताना त्याला घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप दिसून आले नाही, तसेच घराचा दरवाजाही उघडाच होता. त्याने घरात जाऊन पाहणी केली असता, त्याला घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने त्याने घडलेली घटना मुजाहिद याला सांगितली. यावेळी त्याला घरातील लोखंडी कपाटाचे लॉक हे वाकलेले दिसून आले. तसेच त्यातील सोन्याचे दागिने, मोबाइल दिसून न आल्याने घरात चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.