जळगावमध्ये महिलेची निर्घृण हत्या

| जळगाव | वृत्तसंस्था |

शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोडनगरमध्ये एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.10) रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. सुवर्णा राजेश नवाल (57) असे मृत महिलेचे नाव आहे. रणछोडनगरमध्ये सुवर्णा नवाल वास्तव्याला होत्या. त्यांचे पती राजेश नावाल धान्याचे व्यापारी आहेत. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुवर्णा नवाल घरी एकट्या होत्या. अज्ञात व्यक्तीने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला. राजेश नवाल घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. हा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला, यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशीला सुरुवात केली आहे. सुवर्णा नवाल यांच्या मागे पती राजेंद्र नवाल, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version