| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील डोंगरीच्या शालीमार हॉटेलजवळ धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या टोकाच्या भांडणाचा राग मनात ठेवून जूमराती मोहम्मद शेख या इसमाची झोपेत डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे .
मुंबईतील डोंगरी परिसरात दोन दिवसांपूर्वी शंकर सोनवणे आणि जुमराती शेख यांच्यात टोकाचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात ठेवून शंकर सोनवणे या इसमाने जूमराती झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. डोंगरी परिसरातील शालीमार हॉटेल जवळ ही घटना घडल्याचे जे जे पोलिसांनी सांगितले. रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पुढील तपास सुरू केला असून, शंकर सोनवणेला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास जे जे मार्ग पोलीस करीत आहेत.