बीएससी बॅचचा स्नेह मेळावा

| पाली/बेणसे | वार्ताहर |

जळगाव जिल्ह्यातील प्रताप कॉलेज अमळनेर येथील 1991 मधील बीएससी बॅचचे मित्रमंडळ गेले 6 वर्ष सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह मेळाव्याचे आयोजन करत आहेत. या वर्षी (दि.24) ते (दि.25) रायगड जिल्ह्यातील मुरुड परिसरात स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होत.

यावेळी सर्वांनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या वर्षीचा मुरुड परिसरातील 1991 च्या बीएससी बॅचचा अविस्मरणीय स्नेह मेळावा ठरला असल्याचे सर्व प्रतापियन्स मित्रांनी सांगितले. दरम्यान, काशीद येथील हॉटेल पूर्वाच्या नियोजनाचे सर्व प्रतापियन्स मित्रांनी कौतुक केले. या स्नेह मेळाव्यामध्ये शामकांत नेरपगार, जीतेंद्र पाटील, सुनिल पाटील, महेश पाटील, राजेंद्र पाटील, अनिल दुसाने, प्रदीप शिंगाणे, राजेंद्र भावसार, मयूर पाटील, चंद्रकांत साळुंखे, विष्णू सोनवणे, किशोर शिंगाणे, चिंतामण पाटील, सुवर्णसिंग जमादार, राजु कोळी, जमनादास पाटील, विवेक व्यास, गणेश जाधव, योगेश भामरे, प्रवीण मोरे, कमलाकर सूर्यवंशी असे एकूण 21 प्रतापियन्स मित्र सहभागी झाले होते.

Exit mobile version