बिल्डरकडून शेतकर्‍याला बेदम मारहाण

। पनवेल । प्रतिनिधी ।
मे. अमन डेव्हलपर्सचे मालक मनोजकुमार सिंग या बिल्डरच्या बॉडीगार्ड्सने पनवेलमधील मोठा खांदा येथील शेतकरी उद्देश टेंबे यांना जबरदस्तीने गाडीत टाकून अपहरण करून ऑफिसला नेऊन हॉकी स्टिक व फावड्याच्या दांड्याने जबरदस्त मारहाण केल्याची घटना घडली.
सदर डेव्हलपर बिल्डींगचे काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण करीत नाही व करारामध्ये ठरल्याप्रमाणे बांधकाम पूर्ण न केल्यास द्यायचे भाडेसुद्धा देत नाही याबाबत सतत विचारणा करण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी गेल्याने त्याचा राग मनात धरून बिल्डर व त्याच्या बॉडिगार्ड्सने जबरदस्तीने गाडीत भरून ऑफिसला नेऊन बेदम मारहाण केल्याचे फिर्यादी उद्देश टेंबे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून बिल्डर मनोजकुमार सिंग याने माझ्या सासर्‍यांसह अनेक गरीब शेतकर्‍यांना फसविले असून त्याची कसून चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व आम्हा गरीब शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी उद्देश टेंबे यांनी केली आहे.

Exit mobile version