| छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी |
जालना जिल्ह्यातील ब्रम्हपुरी गावातून मुलाचे अपहरण करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिमुकल्या मुलाचे अपहरण करणाऱ्यांना उचलण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे मुलाचे अपहरण करण्यात आलेल्या कारचा अपघात झाल्यामुळे अपहरणकर्ते सापडले. संभाजीनगर शहरातून ज्या गाडीतून मुलाचे अपहरण करण्यात आले होते, त्या गाडीचा जालना जिल्ह्यातील भोकरदन जवळ अपघात झाला. त्यामुळे अपहरण प्रकरणातील आरोपी सापडले आहेत. अपघात झाल्यामुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, या चार आरोपींना संभाजीनगरकडे रवाना करण्यात आले असून मुलगाही सुखरुप आहे.