। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन येथील तहसील कार्यालय जुन्या जागेतून नवीन जागेत (प्रशासकीय भवन येथे) स्थलांतरित झाल्यालादेखील बरीच वर्षे झाली होती. तरीही भ. महावीर मार्गावरील जुनी मोडकळीस आलेली इमारत मरणासन्न अवस्थेत तग धरुन उभी होती. तिचा जिना तर केव्हाच पडून गेला होता आणि इतर भागही केव्हाही कोसळुनअपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. कृषीवलने यावर आवाज उठविला जात होता. याची दखल घेत ही जुनी इमारत नुकतीच पाडण्यात आली आहे. त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.