शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त
| नेरळ | प्रतिनिधी |
कोदिवलेतील शेतकरी भाऊ सोनावळे यांच्या जनावरांची चोरी करण्यात आली. त्यानंतर त्या बैलाची कत्तल करण्यात आल्याने शेतकरीवर्गातून संताप व्यक्त होत आहे.
दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात कोदिवले गावातील शेतकरी भाऊ विठ्ठल सोनावळे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 21 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2 ते 3 वाजताच्या सुमारास अज्ञात लोकांनी बैलाची चोरी केली. भाऊ सोनावळे दररोज आपल्या गुरांना चरायला नेले होते. त्या दिवशी बैल आपली वाट चुकलेला सोनावळे ही आपली उरलेली गुरे घेऊन घरी परतले. जनावरे वाट चुकल्यानंतर पुन्हा घरी परतत असताना तो नेहमीप्रमाणे परत येईल, असा विचार करून ते निघाले. मात्र, त्या बैलाची चोरी झाली होती आणि त्या बैलाची त्याच परिसरात कत्तल करण्यात आली. कत्तल करणाऱ्या व्यक्तींनी त्या बैलाचे कत्तल करून विविध साहित्य त्याच भागात अस्ताव्यस्त करून फेकून दिले होते. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या दिवशी बैलाचे चोरी करून आर्थिक नुकसान केले आहे.
शेतीच्या कामासाठी अत्यावश्यक असलेला बैल गमावल्यामुळे सोनावळे यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या घटनेनंतर गोरक्षक संघटना, शेतकरी बांधव आणि नागरिकांनी तात्काळ आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. याबाबत शेतकरी भाऊ सोनावळे यांच्याकडून पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.






