बीसीसीआयने सुनावली शिक्षा
। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोलकाता नाईट रायडर्सनं बुधवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये खेळलेल्या दोन खेळाडूंवर बीसीसीआयने कारवाई केली आहे. टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (आणि कोलकाता नाईट रायडर्सचा भारतीय बॅटर नितिश राणा यांच्यावर आयपीएल स्पर्धेची आचारसंहिता भंग केल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. बुमराह आणि नितिश यांनी कोणत्या नियमांचा उल्लंघन केला आहे, याचा खुलसा अद्याप करण्यात आली नाही. या दोघांवरही लेव्हल 1 अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती मॅचनंतर देण्यात आली आहे. या शिक्षेनुसार दोघांच्या मॅच फिसमधील 10 टक्के रक्कम कापून घेण्यात येईल. या दोन्ही खेळाडूंनी त्यांची चूक मान्य केली आहे.
बुधवारी झालेल्या मॅचमध्ये पॅट कमिन्सच्या (झरीं र्उीााळपी) या वादळी खेळीमुळे केकेआरने मुंबईचं 162 रनचं आव्हान 16 ओव्हरमध्येच पार केलं. केकेआरला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 35 रनची गरज होती, पण डॅनियल सॅम्सने एकाच ओव्हरमध्ये 35 रन दिले. सॅम्सच्या 16 व्या ओव्हरमध्ये कमिन्सने 4 सिक्स आणि 2 फोर मारल्या, याचसोबत त्याने एक नो बॉलही टाकला. कमिन्सने तब्बल 373.33 च्या स्ट्राईक रेटने रन काढल्या. सॅम्सने 3 ओव्हरमध्ये 50 रन दिले, त्याला एक विकेट घेण्यात यश आलं. याशिवाय मिल्स आणि मुरुगन अश्विन यांनी 2-2 विकेट घेतल्या. कमिन्सशिवाय व्यंकटेश अय्यरने 41 बॉलमध्ये नाबाद 50 रनची खेळी केली. आयपीएल इतिहासतल्या सगळ्यात जलद अर्धशतकाच्या विक्रमाची पॅट कमिन्सने बरोबरी केली. केएल राहुल यानेही 14 बॉलमध्येच अर्धशतक केलं होतं. कमिन्स 15 बॉलमध्ये 56 रनवर नाबाद राहिला, त्याच्या या तडाखेबंद खेळीमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता.