बंगल्याला आग; दुर्दैवाने इसमाचा मृत्यू

। पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुकयातील आकुर्ली गाव येथील एका बंगल्याच्या बेडरूमला लागलेल्या आगीत दुर्दैवाने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ड्रीम हौस या बंगल्याच्या बेडरूमला रविवारी सकाळी अचानकपणे आग लागून राजा ठाकूर या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या आगीची माहिती मिळताच पनवेल, नवीन पनवेल व कळंबोली परिसरातील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी रवाना होऊन त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Exit mobile version