| पनवेल | वार्ताहर |
पनवेलजवळील करंजाडे कॉलेज फाटा येथे दुपारच्या सुमारास एका झोपडीला लागलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला आहे. करंजाडे कॉलेज फाटा येथील सेक्टर 2 ए, अॅक्सिस बँकेच्या मागील बाजूस असलेल्या एका झोपडीस अचानकपणे आग लागली. या झोपडीमध्ये सादिक विदिक शेख (65) हे झोपले होते. त्यात त्यांचा दुर्दैवाने होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच सामानाचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे बंब व पनवेल शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना होऊन त्यांनी आग अटोक्यात आणली.