आरोपीमध्ये गावातील तरूणाचा सहभाग
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील किहीममधील कामथ येथील घरात घुसून चोरट्यांनी घरफोडी केली होती. मांडवा पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणला असून, या गुन्ह्यातील दोघांना गजाआड करण्यात आले आहे. आरोपींमध्ये गावातील तरुणाचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किहीम परिसरातील कामथ येथील दर्शना काठे यांच्या घरात घुसून चोरट्यांनी 25 ते 30 जुलै या कालावधीत घरफोडी केली. लोखंडी कपाटातील लॉकरमधून 2 लाख 33 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. अखेर दहा दिवस हा गुन्हा उघडकीस करण्यात आला.
चिराग काठे (19) रा. किहीम-कामथ व करण पवार (24) रा. भाल-पाटीलवाडा या दोन आरोपींना रविवारी (दि.9) अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे, पोलीस निरीक्षक मांडवा सागरी सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक तसेच पोलीस पथक वेगवेगळ्या पद्धतीने तपास करून चोरट्यांपर्यंत पोहोचले. गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.






