। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग शहरात शनिवारी तीन ठिकाणी घरफोडी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेवस बायपास येथे दोन ठिकाणी तर विद्यानगरमध्ये एक असे एकूण तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सुरु असून उशिरापर्यंत माहिती सांगण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.