। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दि.8 ते दि.27 ऑक्टोबर रोजी 12:30 वा च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी रा.तुलसी आंगन सोसायटी बिल्डींग नं.09,रुम नं.04 या घराच्या दरवाजाचे लॉक उघडुन कॅमेरा, जॉनी वॉकर स्कॉच, साउंड सिस्टीमचा स्पीकर असा एकूण 49 हजार रुपये किंमतीच्या वस्तु चोरुन नेल्या व पुन्हा लॉक बंद केले. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.276/2021 भा.दं.वि.क.380 गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहाय्यक फौजदार जगताप हे करीत आहेत.