। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील आसलपाडा येथील महिला शेजारी यांच्याकडे गेली असता त्यांच्या घराच्या मागील बाजूला उघड्या असलेल्या दरवाजामधून अज्ञात लोक घरात घुसले आणि त्यांनी सोन्याची गंठण चोरी केली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत आसलपाडा येथील फिर्यादी यांच्या घराच्या समोरील दरवाजाला लॉक करुन त्यांचे लहान मुलीस घेऊन शेजारी नातेवाईक यांच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडून अनवधानाने घराचा मागील दरवाजा आतील बाजूने बंद करण्याचा राहून गेल्याने त्या उघड्या दरवाजावाटे कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील कपाटाचे लॉकरमधील पर्समध्ये ठेवलेले एकूण 1,53,000/- रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरुन नेले. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.