माणगाव, गोरेगाव, महाड, तसेच कोलाड पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी

मोटारसायल चोरीचे गुन्हे उघडकीस सहा आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाची कारवाई

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
माणगाव पोलीस ठाण्यात 7 गुन्हे, गोरेगाव, पोलादपूर, महाड शहर तसेच कोलाड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा 11 गुन्ह्यांतील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाने जेरबंद केले आहे. माणगाव, गोरेगाव, महाड, तसेच कोलाड पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर गुन्ह्याच्या समांतर तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सीसीटीव्ही कॅमेरा, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे उपनिरीक्षक चव्हाण, कदम आणि टीम यांनी खालील आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून त्याचेकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी माणगाव पोलीस ठाणे कडील 7 गुन्हे, गोरेगाव पोलीस ठाणे 1, पोलादपूर पोलीस ठाणे 1, महाड शहर पोलिस ठाणे 1, तसेच कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील 1 अशा 11 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

विलास मोतीलाल हरजीवन वय 19 रा. पारगाव खंडाळा, सातारा, मोबीन अतीअल्ला खान वय 20 रा. पारगाव खंडाळा, सातारा, सनी लहू पवार वय 20 रा. कात्रज बोगदा कचरा डेपो, पुणे, अनिल अंकुश काळे वय 19 रा. सध्या पारगाव खंडाळा सातारा, सागर रामतीर्थ गौतम वय 20 रा. सध्या पारगाव खंडाळा, सातारा, राजू मोहन चव्हाण उर्फ आप्पा रा. सिन्नर झोपडपट्टी नाशिक रोड अशी आरोपींची नावे आहेत.

या आरोपीकडून गुन्ह्यात चोरी झालेला 3 लाख 11 हजार 900/- रूपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात चोरी केलेले 2 मोबाईल, चोरी केलेल्या 2 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. उघडकीस आलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेला एकूण 90% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोउनि विकास चव्हाण, पोऊनि महेश कदम, पोहवा/शामराव कराडे, पो. हवा/ प्रतीक सावंत मपोहवा/अभियंती मोकल, पोना/विशाल आवळे , पोना/अनिल मोरे, पोहवा/राकेश म्हात्रे,पोशी / मोरेश्वर ओमले, सायबर सेल चे पोना/तुषार घरात आणि पीसी अक्षय पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version