मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग ट्रेलरचा थरार

। कोलाड । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेत खांब बाजुकडून विळा भागाड पोस्को कंपनीत कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रेलरच्या केबिनने अचानक पेट घेतला. परंतु, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरून खांब बाजुकडून विळा भागाड येथील पोस्को कंपनीकडे कॉईल घेऊन जाणाऱ्या हा ट्रेलर मंगळवारी (दि. 17) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी बाजारपेठेतील वाघमारे चहा समोर आला असता या चालत्या ट्रेलरच्या केबिनने अचानक पेट घेतला. हे वाहन चालकाच्या लक्षात येताच त्यांने प्रसंगावधान दाखवत या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाघमारे चहाच्या स्टॉलमधून पाणी आणून ही आग विझाविण्यासाठी प्रयत्न केल्याने व आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु, या ट्रेलरला लागलेल्या आगीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. आग विझाल्यानंतर कोलाड पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत सुरु केली.

Exit mobile version