भीषण अपघात! बसने ७ वाहनांना चिरडले; प्रवाशांमध्ये भीती

। मुंबई । प्रतिनिधी ।
ब्रेक फेल झाल्याने मुंबई शहरातील बेस्टच्या बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात बसचा चालक व वाहक दोघेही जखमी झाले. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये प्रवासीही होते. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे कळत आहे. परिस्थिती गंभीर असतानाही चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलिक किसन धोंगडे हे 326 क्रमाकांची बस चालवत होते. ही बस शिवशाही प्रकल्प, दिंडोशी वरून कुर्ल्याकडे जात होती. त्यावेळी साधारण साडे तीन वाजेच्या सुमारास संतोष नगर बीएमसी कॉलनी, डी वार्ड समोरील मंदिराला बसने धडक दिली. बसने केवळ धडकच दिली नाही तर बस समोरील जेवढ्या रिक्षा होत्या त्या सर्व रिक्षाचा चेंदामेंदा झाला. या अपघातात बस चालक आणि वाहक दोघेही जखमी झाले असून काही बस प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेदांत खासगी रूग्णालय, दिंडोशी येथे उपचार सुरू आहेत.

Exit mobile version