मुंबई- गोवा महामार्गावर बस पलटी; दोघांचा मृत्यू

। रोहा । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठाणेजवळ सुकेळी खिंडीत शुक्रवारी (दि. 3) पहाटे खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच, या अपघातात तब्बल 38 प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेली खाजगी ट्रॅव्हल्स बस सुकेळी खिंडीतून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस अचानक पलटली. वळणदार रस्ता आणि वेग यामुळे हा अपघात झाला घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले. पोलीस प्रशासनही काही वेळातच पोहोचले. विशेष म्हणजे, या अपघातात एक महिला बसच्या खाली अडकली होती. या अपघातातील 8 ते 9 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबई आणि मुंबई येथील रुग्णालयांत हलवण्यात आले आहे. इतर जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version