| माणगाव | प्रतिनिधी |
छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संचलित माध्यमिक विद्यामंदिर रातवड येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सुलभ शैक्षणिक प्रवासासाठी प्राप्त झालेल्या टाटा विंगर स्कूल बसचे उद्घाटन सोमवारी (दि.23) पार पडले. सुमन रमेश तुलसीयानी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या उदार सहकार्याने विद्यालयाला ही स्कूल बस प्राप्त झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची दीर्घकालीन गरज पूर्ण होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुलसीयानी ट्रस्ट हेड ॲडमिनिस्ट्रेशन अँड प्रोजेक्ट मनीष रूपानी, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक, शालेय समिती अध्यक्ष सुनील पाटील, नाना पालकर स्मृती समिती सहसचिव प्रवीण पाटील, माणगाव पोलीस निरिक्षक संजय बांगर, दीपक जाधव, सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. बसच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रवासाला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रवासाला नवी दिशा, हा संदेश देत हा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा
