| उत्तराखंड | वृत्तसंस्था |
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली. अलकनंदा नदीत एक बस कोसळली. या दुर्घटनेत 11 जण वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे. तर 9 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेनंतर बचावकार्य वेगानं सुरू आहे. सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. टेम्पो ट्रॅव्हलर किंवा मिनी बस असण्याची शक्यता आहे. प्रवाशांना घेऊन जात असताना गाडी नदीत कोसळली. एक मृतदेह सापडला आहे. गाडीत 18 ते 20 प्रवासी असावेत असा अंदाज आहे. बस राजस्थानहून आल्याचे ही सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त बसमध्ये 18 जण होते. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. तर 7 जण जखमी आहेत. जखमींमध्ये 9 वर्षांच्या दोन मुलांचाही समावेश आहे. या दोन्ही जखमी मुलांना रुग्णालयात दाखल केलं आहे. तर 10 जण बेपत्ता झाले आहेत.
आज सकाळी घोलथिरहून प्रवास करणारा प्रवासी महामार्गावरून थेट दरीत पडून अलकनंदा नदीत पडला तेव्हा हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वाहनातील काही लोक आधीच बाहेर पडले होते. हे वाहन रुद्रप्रयागहून बद्रीनाथला जात असताना अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना हेलिकॉप्टरने एम्स ऋषिकेश येथे पाठवण्यात आले आहे. एकाला श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 4 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने कारवाई केली आणि एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि डीडीआरएफ पथके घटनास्थळी पाठवून जलद बचाव कार्य सुरू करण्यात आले. आपत्ती निवारण पथके बेपत्ता असलेल्या 10 जणांचा शोध घेत आहेत.






